NEET 2018 चा निकाल जाहीर, 99.99% सह कल्पना कुमारी देशात प्रथम
बारावीचा निकाल, त्यापाठोपाठ सीईटीनंतर आज सीबीएसईने `नीट` चा निकाल आज जाहीर केला आहे.
मुंबई : बारावीचा निकाल, त्यापाठोपाठ सीईटीनंतर आज सीबीएसईने 'नीट' चा निकाल आज जाहीर केला आहे. देशभरात चिकित्सा आणि दंत महाविद्यालयासाठी ही परीक्षा आवश्यक असते. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी ही परीक्षा आवश्यक आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना cbseneet.nic.in आणि cbseresults.nic.in.या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.
कल्पना कुमारी अव्वल -
कल्पना कुमारीने 99.99% गुणांसह भारतामध्ये अव्वल स्थान कमावले आहे. कल्पनाला भौतिकशास्त्रामध्ये 180 पैकी 171, रसायनशास्त्रामध्ये 180 पैकी 160 तर जीव विज्ञान ( बायोलॉजी) मध्ये 360 पैकी 360 मार्क्स मिळाले आहेत.
यंदा 6 मे रोजी पार पडलेल्या नीट परीक्षेला 13,26, 725 विद्यार्थी बसले होते. सीबीएसई, भारतीय चिकित्सा परिषद आणि भारतीय दंत चिकित्सा परिषदेतर्फे एमबीबीएस, बीडीएसच्या अभ्यासासाठी ही परिक्षा आवश्यक आहे.
एम्स आणि पुद्दूचेरीमधील जेआईपीएमईआरमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा आवश्यक नाही.