नेपाळमध्ये (Nepal) आलेल्या भूकंपाने (earthquake) आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतलाय. या भूकंपाने हादरे भारतात दिल्लीसह आठ राज्यांमध्ये बसले आहेत. बुधवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने अनेक ठिकाणी पडझड झालीय. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या भूकंपाचे भारताची राजधानी दिल्ली (Earthquake in Delhi-NCR) आणि आसपासच्या भागात जाणवले. त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी 6:27 वाजता 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील पिथौरागढ (Pithoragarh Earthquake) येथे होता. भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती.


भूकंप का येतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमधील डोटी जिल्ह्यात भूकंपानंतर एक घर कोसळल्यानंतर तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर मृतांचा आकडा आता 6 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 4 वेळा हादरले. दिल्लीतही या भूकंपाची तीव्रता जाणवली. पृथ्वीच्या भूगर्भात सातत्याने काही नाही का हालचाली होत असतात. पृथ्वीच्या भूगर्भातील रचना ही प्लेट्सच्या स्वरुपात असते ज्या सातत्याने एकमेकांवर आदळत असतात. या प्रक्रियेमुळे हजारो छोटे मोठे भूकंप होत असतात. या प्लेस्ट एकमेकांवर आदळल्यानंतर जी उर्जा निर्माण होते त्याला भूकंप म्हणतात.


भूकंपाची तीव्रता कशी मोजतात?


नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (richter scale) 6.3 इतकी आहे. स्केलच्या श्रेणीनुसार, हा हादरा मध्यमपेक्षा जास्त मानला जाऊ शकतो. म्हणजे जर भूकंपाची तीव्रता 2 स्केलवर असेल तर ती 1 पेक्षा 10 पट अधिक तीव्र असेल. रिश्टर स्केलवरील तीव्रतेची प्रत्येक पातळी मागील पातळीपेक्षा 10 पट अधिक तीव्र असते.


किती नुकसान होतं?


जर भूकंप 0-1.9 रिश्टर स्केल असेल तर तो फक्त सिस्मोग्राफद्वारे शोधला जाऊ शकतो.


जर भूकंप 2 ते 2.9 इतक्या तीव्रतेचा असेल लटकवलेल्या वस्तू हलू लागतात.


जर भूकंप 3 ते 3.9  या दरम्यान असेल तर बहुतेक लोकांना हादरे जाणवतात.


जर भूकंप 4 ते 4.9 तीव्रतेचा असेल तर प्रत्येकाला हादरे जाणवतात. तसेच छोट्या-छोट्या गोष्टी तुटण्याची शक्यता असते.


जर भूकंप 5 ते 5.9 इतक्या तीव्रतेचा असेल तर घरे, कार्यालये यांसारख्या ठिकाणी फर्निचर हलू लागते. भिंतीवरून प्लास्टर पडण्याचीही शक्यता असते.


जर भूकंप 6 ते 6.9 तीव्रतेचा असेल तर इमारतींचे गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच, जास्त लोकसंख्या असलेल्या भागात मध्यम स्वरुपाचे नुकसान होऊ शकते.


जर भूकंप 7 ते 7.9 तीव्रतेचा असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास सुरुवात होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7 किंवा त्यापेक्षा जास्तीची आढळली तर जीवितहानी होऊ शकते. तसेच इमारती कोसळू शकतात आणि जमिनीला भेगा पडू शकतात.


जर भूकंप 8 ते 8.9 इतक्या तीव्रतेचा असेल तर मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. यात अनेकांचे प्राण गमवावे लागण्याची शक्यता असते.


जर भूकंप 9 किंवा अधिक असेल तर त्सुनामी येण्याचीही शक्यता असते.