मुंबई : नेपाळमधील विमान अपघाताची घटना रविवारी घडली. नेपाळमधील तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 22 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये 4 भारतीय 2 जर्मन, 3 क्रु मेंबर आणि उर्वरीत नेपाळी लोक प्रवास करतं होते. खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला, यामध्ये सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयान होता की, या विमानाचे छोटे छेटे तुकडे झाले. या घटनेचे फोटो सोमवारी म्हणजे आज समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर सोमवारी आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले.  महाराष्ट्रातील ठाणे येथे राहणारे अशोक कुमार त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीसह दोन मुलांचा नेपाळमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. अशोक आपवी पत्नी वैभवीपासून वेगळे राहत होते. त्यानंतर विमान अपघातामुळे या दोघांच्या मिलनाचा वेदनादायक अंत झाला.


ओडिशामध्ये कंपनी चालवणारे अशोक त्रिपाठी (५४) आणि मुंबई शेजारच्या ठाणे शहरात रहाणाऱ्या ५१ वर्षीय वैभवी बांदेकर त्रिपाठी या आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहात होत्या. परंतु त्या आपल्या मुलांना घेऊन आपल्या नवऱ्याला भेटायला गेल्या होत्या.


वैभवी आणि त्यांचा मुलगा धनुष (२२) आणि मुलगी रितिका (१५) हे ठाणे शहरातील बलकम भागातील रुस्तमजी अतिना अपार्टमेंटमध्ये राहत होते. आता त्यांच्या कुटुंबातील 80 वर्षीय आई या एकमेव जिवंत व्यक्ती आहेत. असे अधिकाऱ्याने सांगितले.


खरंतर या आजींची प्रकृती बिघडली आहे, ज्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांना विमान अपघाताबाबत काहीही सांगितले नाही.


या विमान अपघातात २२ जणांचा मृत्यू


अशोक त्रिपाठी, वैभवी आणि त्यांची दोन मुले रविवारी तारा एअरलाइन्सच्या विमानात चढले होते, ज्यांचे मृतदेह सोमवारी नेपाळच्या डोंगराळ जिल्ह्यात मुस्तांग येथे सापडले. विमानात चार भारतीय, दोन जर्मन, १३ नेपाळी नागरिक आणि तीन क्रू मेंबर्स होते.


तारा एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पोखरा या पर्यटन शहरातून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान हिमालयीन प्रदेशात कोसळले. ज्यामुळे २२ लोकांचा मृत्यू झाला आहे.