Hotel Tips : हॉटेलच्या खोलीत चुकूनही करू नका `हे` काम, नाहीतर होईल नुकसान
तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे हॉटेलमध्ये जाऊन राहातात. तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.
मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे कधी ना कधी हॉटेलमध्ये राहिलं असेल. बऱ्याचदा कुठेतरी फिरायला गेल्यावर किंवा कामासाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, ज्यामुळे तेथे आपल्याला रात्र काढण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी हॉटेलची रुम घ्यावी लागते. तसे पाहाता आजकाल घरी बसून आपल्याला हॉटेल्समध्ये रूम बुक करता येतात. तरी देखील अनेक लोक असे आहेत, हे त्या ठिकाणावर जाऊन रुम हुक करतात.
तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे हॉटेलमध्ये जाऊन राहातात. तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे.
अलीकडेच टिकटॉक या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर एका महिलेने हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याचा खुलासा केला आहे.
यासंबंधीत एक व्हिडीओ शेअर करताना टिकटॉक युजर @queenevangeline25 म्हणाली की, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला वाटते की हॉटेलच्या खोल्या पूर्णपणे स्वच्छ आहेत, परंतु प्रत्यक्षात तसे नाही.
टिकटॉक वापरकर्त्यानी काही मार्ग सांगितले, ज्याद्वारे आपण हॉटेलमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. महिलेने सांगितले की, जर तुम्ही हॉटेलमध्ये राहत असाल, तर फक्त बाटलीबंद पाणी पिण्याचा प्रयत्न करा, कारण हॉटेलच्या खोलीत ठेवलेल्या पाण्याचे ग्लास घाण असू शकतात. कारण ते दररोज स्वच्छ केले जात नाहीत.
याशिवाय हॉटेलच्या छतावर, बाल्कनीत आणि खिडक्यांवर उभं राहताना काळजी घ्या, असं महिलेने सांगितलं. येथे उभे राहणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
महिलेने पुढे सांगितले की, आजकाल डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्येही खूप वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलच्या वाय-फायचा वापरही टाळावा. आवश्यक असल्यास VPN वापरा, जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहिल.