देशात ब्रिटनवरुन आलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली
देशात नव्या कोरोना व्हायरसचं सावट कायम...
नवी दिल्ली : देशात नव्या कोरोना स्ट्रेनचं सावट कायम आहे. ब्रिटनहून अहमदाबादमध्ये आलेल्या ४ जणांना कोरोना झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे.
देशात नव्या कोरोना स्ट्रेनचं सावट वाढताना दिसतंय. आणखी 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. देशात एकीकडे ब्रिटनहून येणाऱ्या विमानं पुन्हा सुरु होणार आहे. पण त्यासाठी काही गाईडलाईन्स सरकारने जारी केले आहेत.
ब्रिटनहून अहमबादमध्ये आलेल्या चार जणांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणं आढळन आली आहेत. चारही रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे देशात कोरोना लसीबाबत उत्सूकता कायम आहे. भारतात लवकरच लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.