अमर काणे, प्रतिनिधी, झी २४ तास, नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीच राहणार आहे. दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर हे स्पष्ट झालं आहे. भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणाच, पण मित्रपक्षांनाही निवडून आणा, असे आदेश अमित शाह यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वीच होणार आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णयही काही काळानंतर घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाराष्ट्रात भाजपा पक्षसंघटनेत महत्त्वाचे बदल करणार आहे.


आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मोडमध्ये आलो आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच केंद्र सरकारकडून मदतीबाबतही आम्ही चर्चा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचं संपूर्ण देशाचं वेळापत्रक ठरलेलं असतं, त्यानुसारच बदल होतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.