नवी दिल्ली : राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) गुरूवारी जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे.


अव्वल ठरली राजधानी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ मध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) नुसार देशात घडलेल्या गुन्हांत ३८.८% हिस्सा दिल्लीचा असल्याने या क्रमवारीत दिल्ली अव्वल ठरली आहे.


दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर 


त्यानंतर ८.९% गुन्हे हे बंगळूर येथे घडलेले असल्याने या क्रमवारीत हे राज्य दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत ७.७% गुन्हांची नोंद झाली आहे.


देशभरात इतके गुन्हे


बलात्कार, हत्या, अपहरण यांसारख्या एकूण ४८,३१,५१५ गुन्हांची नोंद देशभरात झाली आहे. यात २९,७५,७११ गुन्हे हे आयपीसीच्या अंतर्गत येतात. तर १८,५५,८०४ गुन्हे विशेष व स्थानीय कायद्यासंबंधित श्रेणीत येतात. २०१५ मध्ये देशभरात एकूण ४७,१०,६७६ गुन्हांची नोंद झाली होती.