मुंबई : अजूनपर्यंत तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर मोदी सरकारने तुमच्या नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ITR करता नवीन फॉर्म सादर केला आहे. सीबीडीटीने सादर केलेला हा फॉर्म गेल्यावर्षीच्या फॉर्म पेक्षा तुलनेने अधिक सोपा आहे. त्यामध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. 


अगदी सोप्या पद्धतीने भरू शकता फॉर्म 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर भरण्याचा हा फॉर्म अगदी सहज भरता येणार आहे. एका पानाचा हा फॉर्म असून गेल्यावर्षी 3 करोड लोकांनी याचा वापर केला आहे. सीबीडीटीने सांगितले आहे की, व्यक्ती आणि हिंदू अविभाजीत कुटुंबासाठी ज्यांची कमाई हे पारंपरिक पद्धतीने मिळत नाही त्यांच्यासाठी आयटीआर 2 ला जोडलं आहे तर ज्या लोकांना पारंपरिक पद्धतीने व्यवसायातून कमाई मिळते त्यांच्यासाठी आयटीआर 3 आणि आयटीआर 4 हा फॉर्म भरावा लागणार आहे. ग्रेच्युटीसाठी आता 5 वर्ष थांबण्याची गरज नाही, मोदी सरकार लवकरच देणार खुषखबर


 



फॉर्ममध्ये या गोष्टी आहेत नवीन 


सीबीडीटीच्या माध्यमातून जाहीर केलेल्या फॉर्ममध्ये करदातांकडून सॅलरी स्ट्रक्चर, प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती अधिक प्रमाणात द्यावी लागणार आहे. तसेच लघुद्योग संदर्भात गुड्स आणि सर्विसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर आणि जीएसटीच्या अंतर्गत असलेल्या नव्या टर्नओव्हरची माहिती द्यावी लागणार आहे. 


इथून डाऊनलोड करा फॉर्म 


नवीन आयटीआर फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयटीआर - 1 ते आयटीआर - 7 पर्यंतचे सर्व फॉर्म पीडीएफ स्वरूपात मिळतील. हे फॉर्म क्लिक करून डाऊनलोड करू शकता.