मुंबई : New Maruti Suzuki Cars: जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करताय. तर देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकी यावर्षी २०२२ मध्ये नवीन गाड्या लाँच करणार आहे. आज आपण मारूतीच्या ७ कारबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 


न्यू जेनरेशन बलेनो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मारूती सुझुकी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी देशात नव्या बलेनो हॅचबॅक लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन मॉडेल खूप अपडेटेड आहे. यामध्ये नवीन इंटीरियर आहे. नवीन बलेनो व्यापक आणि बोल्ड फ्रंट ग्रिलसोबत दिसणार आहे. एलआयडीआरएलसोबत प्रोजेक्टर हॅडलँप, एलआयडी टेल-लाइट आणि नवीन एली व्हीलसोबत ही गाडी दिसणार आहे. 


वॅगनार फेसलिफ्ट 



गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणजे वॅगनार. वॅगनारची फेसलिफ्ट मॉडेल मारूती सुझुकी फेब्रुवारीत लाँच करणार आहे. नव्या मॉडेलला थोड्याफार बदलाने लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये कॉस्मेटिक बदल केले जाणार आहे. १५ इंचाचे अलॉय व्हील्स टॉप वेरिएंट दिले आहेत. 


मारुति सुझुकी XL6



मारूती सुझुकीने एक्सएल ६ ला लाँच केलं आहे. ही कार लाँच झाल्यावर संशय निर्माण झाला. XL6 फेसलिफ्टचे चाचणीला कॅमोफ्लाजमध्ये दिसणार आहे.  हे नवीन बंपर आणि नवीन ग्रिलसह येण्याची अपेक्षा आहे. आतील भाग बहुतेक सारखेच राहू शकतात परंतु यावेळी मारुती सुझुकी XL6 चे 7-सीटर प्रकार जोडू शकते.


मारूती सुझुकी अर्टिगा 



मारूती सुझुकी अर्टिगा सर्वाधिक विकली जाणारी एमपीवी अर्टिगाला अपडेट करण्यावर काम करत आहे. फेसलिस्ट अगोदरच्या कारप्रमाणेच आहे. आतापर्यंत फक्त एक बदल करण्यात आला आहे. ते नवं अपडेटेड ग्रिल आहे जनरेशन बलेनोसोबतही संबंधित आहे. 


मारूती विटारा ब्रिजा 



मारूती आपल्या ब्रिजाच्या सेकेंड जनरेशन मॉडेलला लाँच करण्यास तयार आहे. ग्राहकांना याचं डिझाइन आणि इंजिनबाबत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कंपनी यामध्ये वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, फॅक्ट्री फिटनेस सनरूफ आणि ३६० डिग्री कॅमेरासोबत अपडेटेड इंफोटेनमेंट सिस्टम आणि इंस्टूमेंट क्लस्टर देणार आहे. 


मिड सेग्मेंट SUV



मारूती सुझुकी आणि टोयोटाच्या पार्टनशिपमध्ये एसयूवी लाँच होणार आहे. टोयोटा आणि मारूती सुझुकीच्या जॉइंट वेचरची एसयूवी लेटेस्ट फिचरसह लाँच होणार आहे. 


मारुति सुजुकी डिजायर CNG



मारुति सुजुकी डिजायर CNG कार ऑटो मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कॉम्पॅक्ट सेडानला लवकरच फॅक्ट्री फिटेड CNG किटसोबत लाँच केलं जाणार आहे. ही कार देखील CNG किट आणि १.२ लीटर डुअलजेटच्या १२ सी पेट्रोल इंजिनमध्ये येणार आहे.