नवी दिल्ली : मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटबंदी जाहीर केली. १००० आणि ५००च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने २००० आणि ५००च्या नोटा चलनात आल्यात. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ५०० आणि २हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. ५०० रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे आणि २ हजारांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता ५० रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे. तिचा रंग मयुर पंखी (साधरण हिरवा) असणार आहे.


आता ५० रूपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) डिसेंबर महिन्यातच ५० आणि २० रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या नव्या नोटा छापण्याचंही काम सुरु झालेय. आता या नोटा लवकरच चलनात येणार आहेत. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 ५० रुपयांच्या नोटावरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. ५० रूपयांच्या नोटा लवकरच चलनात आणल्या जाणार आहेत. या नोटांवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. ५० रूपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीयेत. मात्र नव्या नोटा चलनात येणार आहेत. या नोटांच्या मागील बाजूस एका दाक्षिणात्य मंदिराचा फोटो असणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.