नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत `या` गोष्टींचीही घ्या काळजी
New year New Rule : येणारं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा पुसटसा अंदाज नव्या वर्षात होणाऱ्या काही बदलांच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो.
New year New Rule : यंदाचं वर्ष किती भरभर संपायला आलं... नाही का? हा असा प्रश्न प्रत्येक वर्षाच्या शेवटी अनेकजण स्वत:लाच विचारतात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतात. यंदाच्या वर्षीसुद्धा असंच चित्र आहे. 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या प्रत्येकजण सज्ज होत आहे, आपल्या परिनं नव्या संधींची प्रतीक्षा करत आहे. अशा या नव्या वर्षात काही बदलांना तुम्ही सामोरं जाणं अपेक्षित आहे.
2024 या वर्षी बरेच नियम बदलणार असून, व्यावसायित आणि नागरिकांनीही त्याबाबतच सजग असणं अपेक्षित समजलं जात आहे. या नव्या नियमांमध्ये जीएसटी, सीमकार्ड आणि तत्सम नियमांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
रोजगार कायदा
जानेवारी 2024 पासून रोजगार कायद्यामध्ये अनेक बदल होणार आहेत. यामध्ये अंशकालिक मजुर, अनियमित तासांसाठीच्या सुट्टीची मोजणी आणि त्यासाठीची नवीन प्रणाली समाविष्ट आहे. थोडक्यात जे कर्मचारी वेगवेगळ्या तासांसाठी काम करतात किंवा एका निर्धारित काळासाठी काम करतात ते एका खास पद्धतीनं सुट्टी घेऊ शकतात.
जीएसटी दर
पुढील वर्षामध्ये जीएसटीचे दर 8 टक्क्यांवरून 9 टक्के होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू होणार आहे. व्यवसायिक आणि उद्योग क्षेत्रांमध्ये मूल्य निर्धारित होताच हे बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात RBI चं स्पष्ट मत; कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा?
विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रणालीत बदल
अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नोकरीसाठीचा व्हिसा देण्यात येणार नाही. थोडक्यात आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नेदरलँडमध्ये काम करायचं झाल्यास त्यांना शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच व्हिसासाठीचा अर्ज करावा लागेल. थोडक्यात शिक्षण पूर्ण झालेल्यांनाच व्हिसा दिला जाईल.
सिम कार्ड खरेदी करतानाचा नियम
पुढील वर्षापासून सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. थोडक्यात सिमकार्डची विक्री करण्यापूर्वी सरकारकडे त्याची नोंदणी करणं अपेक्षित असेल. शिवाय ग्राहकांनीही सिम कार्ड खरेदी करतेवेळी आपलं ओळखपत्र सादर करणं अपेक्षित असेल.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला वरील नियमांव्यतिरिक्त इतरही नियम, गॅस दर, इंधन दर आणि तत्सम गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँकांची धोरणं आणि व्याजदरातही बदल अपेक्षित असून, नव्या वर्षातील हे बदल तुमच्यावर थेट परिणाम करु शकतात. त्यामुळं सरत्या वर्षाला निरोप देत असताना उत्साहात पार्टी करण्याची तयारी करत असाल तर, नव्या वर्षातील या बदलांसाठीसुद्धा सज्ज व्हा!