New Rules From November: आजपासून बदलले `हे` नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!
New Rule From November: महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी नियमात अनेक बदल केले जातात. यातील काही बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील तर काही तुमच्या खिशाला भारी पडतात.
Changes From 1st November: प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होत असतात ज्यांचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. ऑक्टोबर महिना संपून आजपासून नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. आजपासून होणाऱ्या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किमती, बँकिंग प्रणाली, ट्रेनच्या वेळा इत्यादींचा समावेश आहे. तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (New Rules From 1st November 2022)
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 115.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
विमान प्रवास महागला
याशिवाय तेल कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीत वाढ केली आहे. सरकारी कंपन्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात हवाई तिकिटांच्या किमती वाढू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या किमतीत 4842.37 रुपयांची वाढ झाली आणि दिल्लीत किंमत 120,362.64 रुपये प्रति किलोलीटर झाली.
गॅस सिलिंडर होम डिलिव्हरीसाठी OTP
१ नोव्हेंबरपासून होणारा मोठा बदल म्हणजे गॅस सिलिंडरच्या होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) आवश्यक असेल. सिलिंडर बुक केल्यानंतर, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. हे सांगितल्यानंतरच सिलिंडरची डिलिव्हरी केली जाईल.
KYC नियम
IRDA ने देखील आजपासून मोठा बदल केला आहे. 1 नोव्हेंबरपासून विमा कंपन्यांना केवायसी तपशील देणे आवश्यक झाले आहे. सध्या, नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना KYC देणे तुमच्यावर अवलंबून आहे.
जीएसटी कोड
नोव्हेंबरपासूनच, 5 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना GST रिटर्नमध्ये 5-अंकी HSN कोड प्रविष्ट करणे आवश्यक असेल. आतापर्यंत 2 अंकी HSN कोड टाकला होता. यापूर्वी 1 एप्रिल 2022 पासून 5 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना चार अंकी कोड अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 1 ऑगस्ट 2022 पासून सहा अंकी कोड टाकणे अनिवार्य करण्यात आले.
वाचा : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता एका सिलेंडसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार
वीज सबसिडीशी
दिल्लीत 1 नोव्हेंबरपासून वीज सबसिडीशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या अंतर्गत वीज अनुदानासाठी नोंदणी न करणाऱ्या लोकांना त्याचा लाभ मिळणार नाही. अनुदानासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ होती. मात्र, ती आणखी वाढवणे अपेक्षित आहे.
ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
भारतीय रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून सर्व गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे.