New Rules from 1st October: 1 ऑक्टोंबरपासून बॅंकेचे `हे` नियम बदलणार, जाणून घ्या सविस्तर
सर्वसामान्यांसाठी सर्वांत मोठी बातमी!, बॅकेपासून पेन्शनपर्यत...1 ऑक्टोंबरपासून `हे` नियम बदलणार
मुंबई : येत्या 1 ऑक्टोंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. बँकेशी संबंधित व इतर अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे नेमके हे कोणते नियम बदलणार आहेत, हे सविस्तर जाणून घेऊयात.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड नियमात बदल
येत्या 1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (CoF tokenisation) नियम बदलणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, टोकनायझेशन सिस्टममध्ये बदल केल्यानंतर, कार्डधारकांचा पेमेंट अनुभव सुधारणार आहे. त्यासोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहेत.
दरम्यान याआधी जेव्हा आपण कोणत्याही POS, ऑनलाइन किंवा अॅपवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करतो, तेव्हा त्याचे तपशील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह व्हायचे. त्यात तुम्ही पुन्हा ऑनलाइन किंवा अॅपवर पेमेंट करण्यासाठी जाता तेव्हाच कंपनी तुम्हाला संपूर्ण तपशील विचारत नाही. तिथे तुमचा खाते क्रमांक, कार्ड क्रमांक इत्यादींची आधीच माहीती असते.तुम्हाला फक्त सीव्हीव्ही पुन्हा टाकावा लागतो आणि पेमेंट होते. मात्र 1 ऑक्टोबरपासून हे होणार नाही आहे.
आता कोणत्याच कंपनीच्या पेमेंट मेथडच्या सर्व्हरमध्ये डेटा स्टोअर होणार नाही आहे. आरबीआयच्या (RBI) म्हणण्यानुसार, जर ग्राहकाने डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) किंवा अॅपद्वारे व्यवहार केले तर सर्व तपशील एनक्रिप्टेड कोडमध्ये सेव्ह केले जातील.
ग्राहकांना टोकन मिळणार
नवीन नियमानुसार, रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड (Credit card) किंवा डेबिट कार्डचा (Debit Card) डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक अद्वितीय टोकन वापरावे लागेल.
अटल पेन्शन योजनेत मोठा बदल
अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही सरकारच्या लोकप्रिय पेन्शन योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. आता 1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमात मोठा बदल होणार आहे.नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
जर तुम्ही करदाते आहात आणि अजूनही अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) लाभ घेतला नसेत तर ऑक्टोंबर महिन्यापुर्वी घेता येणार आहेत. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत करदाते असलात तरीही त्यात गुंतवणूक करू शकता. सध्याच्या नियमांनुसार, 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सरकारच्या या पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो.
डिमॅट खाते सुरक्षित होणार
जर तुम्ही डिमॅट खातेधारक (Demat account) असाल आणि याद्वारे तुम्ही शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 14 जून रोजी एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार, डिमॅट खातेधारकांसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.तुम्ही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन न केल्यास, तुम्ही 1 ऑक्टोबर 2022 पासून तुमच्या डीमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज काय म्हणाले?
NSE ने या परिपत्रकात म्हटले आहे की खातेधारकाला त्याच्या डीमॅट खात्यात (Demat account) लॉग इन करण्यासाठी ऑथेंटिकेशन घटक म्हणून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरावे लागेल. यासोबतच अन्य मार्ग म्हणजे नॉलेज फॅक्टर असू शकतो. हा पासवर्ड, पिन किंवा कोणताही पॉजेशन फॅक्टर असू शकतो, जो फक्त वापरकर्त्याला माहीत असतो.