Union Budget 2023 LIVE: 1 फेब्रुवारी 2023 पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार असून आर्थिक भार वाढणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) 2024 लोकसभा निवडणुकीआधीचा (Lok Sabha Election) आपला अखेरचा अर्थसंकल्प (Budget 2023) मांडणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून फार आशा आहेत. यासह बँकिंगशी संबंधित नियमांमध्येही महत्त्वाचे बदल होणार आहे. जाणून घेऊयात नेमकं कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे. 


अर्थसंकल्प मांडला जाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संपूर्ण देश मोठ्या आशेने या अर्थसंकल्पाकडे पाहत आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा केल्या जातील अशी आशा आहे. 


क्रेडिट कार्डवरुन रेंट भरल्यास अतिरिक्त शुल्क


क्रेडिट कार्डवरुन भाडं भरणं महाग होणार आहे. बँक ऑफ बडोदाने क्रेडिट कार्डधारकांना (Bank of Baroda Credit Card) मोठा धक्का दिला आहे. बँकेने जाहीर केलं आहे की, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रेंट पेमेंट्स (Rent Payments) केल्यास 1 टक्का अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. 1 फेब्रुवारी 2023 पासून हा नियम लागू होणार आहे. 


LPG च्या किंमती


LPG गॅस सिलिंडरचे दरांचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आढावा घेतला जातो. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या किंमतींमध्ये घट किंवा वाढ केली जात असते. दरम्यान एलपीजीच्या किंमतीत कोणताही बदल केला जाणार नाही अशी आशा व्यक्त होता आहे. 


टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किंमतीत केली 1.2 टक्क्यांनी वाढ


टाटा मोटर्स (Tata Motors) ने प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किंमती 1 फेब्रुवारीपासून लाग होणार आहेत. कंपनीनुसार, सरासरी आधारावर, मॉडेल आणि प्रकारानुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या प्रवासी वाहनांच्या किंमती 1.2 टक्क्यांनी वाढतील. 


विमान प्रवास महागणार


बजेट पूर्वीच विमान प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. IOC कडून विमानाच्या इंधनाच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशननं आज सकाळीच नवे दर जाहीर केले असून आजपासूनच नवे दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.