प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवे वळण
ग्रुरुग्राममधी भोंडसी स्थित रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्याप्रकरणाला नवे वळण मिळालेय. या प्रकरणातील आरोपी बस कंडक्टर अशोकची पत्नी ममताने मीडियासमोर असा दावा केलाय की तिचा पती निरपराध असून त्याला या प्रकरणात फसवले जातेय.
गुरुग्राम : ग्रुरुग्राममधी भोंडसी स्थित रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्याप्रकरणाला नवे वळण मिळालेय. या प्रकरणातील आरोपी बस कंडक्टर अशोकची पत्नी ममताने मीडियासमोर असा दावा केलाय की तिचा पती निरपराध असून त्याला या प्रकरणात फसवले जातेय.
झी मीडियाशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिने ही बाब सांगितली. ममता तिचा पती अशोकला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती. यावेळी माझे पती रडले तसेच मी निरपराध असून मला यात फसवले जातेय असे सांगितल्याचे ममता यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अशोकला खूप मारहाण केली त्यामुळेच त्याने दबावामध्ये हत्या केल्याचे सांगितले असा दावा पत्नी ममताने केलाय. ममता म्हणाल्या. मी माझ्या पतीला याबाबत विचारले की तुम्हाला का फसवले जातेय. यावर त्यांनी मला उत्तर दिले मला नाही माहीत की मला का फसवले जात आहे.
८ सप्टेंबरला रायन इंटरनॅशनल स्कूलममध्ये सात वर्षांच्या प्रद्युम्नच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्याप्रकरणानंतर आरोपी बस कंडक्टर अशोकला ताब्यात घेण्यात आले.