Christmas And New Year in Goa 2025 : संपूर्ण जगभरामध्ये सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू असून अनेकांचेच बेत सुरू आहेत ती म्हणजे बहुविध ठिकाणांना भेट देण्याचे. सानथोरांना सोबत घेत नवनवीन ठिकाणं पाहण्यासाठी अनेकांचा कल आहे, तर काही मंडळी मात्र ठरलेल्या ठिकाणांनाच पसंती देत तिथं निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी निघाले आहे. अशा सवयीच्या ठिकाणांमध्ये येणारं एक नाव म्हणजे गोवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षाचा शेवट, नाताळ सण आणि गोव्याचं सुशेगाद आयुष्य अनुभवण्यासाठी दरवर्षीप्रमाणं यंदाही गोव्याच्या दिशेनं अनेकांचीच पावलं वळताना दिसत आहेत. सध्या गोव्यात येणारे पर्यटक, हॉटेलांमध्ये झालेलं बुकींग हा एकंदर आकदा पाहता येत्या दिवसांमध्ये या शेजारी राज्यात विक्रमी गर्दी पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये येथील हॉटेलं, रिसॉर्ट, कॉटेज, होमस्टे असे अनेक पर्याय हाऊसफुल्ल असल्याचं पाहायला मिळेल. 


रविवारी रात्रीपासून गोव्यातील पणजी मार्केटमध्येही गर्दी वाढण्यास सुरुवात झाली असून, बुधवारच्या नाताळ सणाच्या अनुषंगानं महत्त्वाची सामग्री खरेदी करणाऱ्यांची पावलं बाजारपेठांच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. रविवारची सुट्टी आणि त्यामागोमाग वर्षअखेरीच्या सुट्ट्या लागून आल्यामुळं गोव्यात येणाऱ्यांचा आकडा दर दिवसागणिक वाढत असून, साधारण या राज्यात 10 लाखांहून अधिक पर्यटक गोव्यात दाखल होतील असं उपलब्ध माहितीवरून लक्षाय येत आहे.


मुंबई गोवा महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली असून, या आठवड्याअखेरीस हे प्रमाण आणखी वाढण्याचे स्पष्च संकेत मिळताना दिसत आहेत. मागील काही वर्षांमध्ये गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. फक्त मुंबई, पुणेच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येनं पर्यटकांचा ओघ या राज्याकडे असून परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. 


हेसुद्धा वाचा : पुण्याचा उल्लेख करत नारायण मूर्ती यांचा गंभीर इशारा; पाहा विचार करायला भाग पाडणारं त्यांचं वक्तव्य 


 


दरम्यानच्या काळात गोव्यामध्ये पर्यटकांसाठीच्या सुविधांमध्येही वाढ झाली असून, या राज्यात जवळपास 70 हजार वाढीव रुमची व्यवस्था आणि 1 लाख बेडची सोय करण्यात आल्याचं कळत आहे. गोव्यामध्ये सध्याच्या घडीला सुविधांमध्ये वाढ करण्यात आलेली असली तरीही इथं येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत या सुविधांचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं वर्षअखेरीस अचानक गोव्याला जायचा बेत आखणार असाल तर दोनदा विचार करा आणि बेत आखलाच असेल तर On the spot booking करण्यापेक्षा Pre Booking चा पर्याय निवडा.