उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. इथे एका गावात लग्नानंतर घरी आलेल्या नववधूची अचानक तब्येत बिघडली.


दारातच महिलांनी केली प्रसूती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नववधूच्या स्वागतासाठी आरतीचं ताट घेऊन उभ्या असलेल्या महिलांना हे समजाला जराही वेळ लागला नाही की, नवरीला प्रसुती कळा येताहेत. महिलांनी आरतीचं ताट बाजूला ठेवून नववधूची प्रसूती केली. या घटनेने नवरदेवाच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसलाय. 


आई-वडीलांवर फसवणुकीचा आरोप


मुलीच्या आई-वडिलांवर मुलाच्या घरच्या फसवणुकीचा आरोप केलाय. तर घडलेल्या प्रकारानंतर नववधूला घरातच घेतलं नाही. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होतीये. या घटनेमुळे संतापलेल्या नवरदेवाने पोलिसात जाऊन मुलीच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दिली आणि मुलीला जाण्यास सांगितले. 


नवरदेवाचा काका झाला बेशुद्ध


घरी आलेल्या नववधूने घराच्या दारात येताच बाळाला जन्म दिल्याच्या घटनेने अनेकांना धक्का बसला. तर मुलाचा काला चक्क बेशुद्ध होऊन पडला. तर मुलाच्या काकूने सांगितले की, विमलेशला आई-वडील नाहीयेत. आमची फसवणूक करण्यात आलीये. आम्ही मुलीला आता ठेवणार नाही. 


मुलीचं काय म्हणनं आहे?


या प्रकाराबद्दल नवरी सोनमने बोलली की, ‘या मुलाबाबत विमलेशला माहिती नव्हतं. मी विमलेशसोबत राहण्यास तयार आहे. जर त्याने ठेवलं तर, नाहीतर आई-वडील सांगतील ते करणार’.