Newly weds  wife Shocked: लग्न बंधन हे पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच नवरा-बायकोने एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल माहिती घेणे योग्य ठरते. असे न केल्यास लग्नानंतर अचानक मोठे धक्के बसण्याची शक्यता असते. मुरादाबादच्या एका नववधूला इतका मोठा धक्का बसला की ती अजूनही त्यातून सावरु शकली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववधूला आपला पती आणि सासरच्या मंडळींबद्दल फारशी माहिती नव्हती. नवऱ्याला सरकारी नोकरी आहे इतकी माहिती घेऊन तिने लग्न केले आणि सासरी राहायला गेली. यानंतर पुढे जे झाले ते धक्कादायक होते. लग्नाच्या काही दिवसांतच तुझ्या दीरासोबत शारीरिक संबंध ठेव असा सल्ला खुद्द सासूच द्यायला लागली होती. 


या घटनेनंतर नववधूने मुरादाबादच्या माझोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. परिसरात राहणाऱ्या या नवविवाहित महिलेने तिचा पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी  झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. 


पीडितेच्या म्हणण्यानुसार, पतीच्या सरकारी नोकरीमुळे आई-वडिलांनी लग्नात सुमारे 30 लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर पती आणि सासरे तिला हुंड्यासाठी टोमणे मारत होते आणि 10 लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी करत होते, असे देखील तिने आरोपात म्हटले आहे. मागणी पूर्ण न झाल्याने आपल्याला त्रास दिला जाऊ लागला अशी तक्रार विवाहितेने केली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडितेने हुंडाबळी, फसवणूक, विनयभंग या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पतीवर नपुंसक असल्याचा आरोप केला आहे. आरोपी पती अमरोहा येथील रहिवासी असून तो दिल्लीत तैनात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.


लग्नानंतर पतीने पीडितेसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तिने याबाबत सासूकडे तक्रार केली असता, तुझा नवरा जन्मतःच नपुंसक आहे, असे तिने सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तू नवऱ्याशी नको तर दीराशी शारीरिक संबंध ठेव, असा अजब सल्ला सासुने दिला. एवढेच नव्हे तर दीराने देखील जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.