मुंबई : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत दुखद बातमी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय खडतर आणि भरपूर दुर्गम अशा रस्त्यावरून अमरनाथ यात्रेला जाता येतं. मात्र आता यात्रेला गेल्यावर तुम्हाला धक्कादायक प्रकार घडणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ना तुम्ही शिवचा जयघोष करू शकता, ना घंटा वाजवून देवाला आळवू शकता. तसेच येथे कोणताही मंत्र जार करायला देखील आता मिळणार नाही. तसेच आता तुम्हाला गुंफेतून प्रसाद देखील मिळणार नाही. एनजीटी कोर्टाने सांगितले की, आता ही गुंफा पूर्णपणे सॅटेलाइट झोन असणार आहे. 


अमरनाथ श्राइन बोर्डाला अशा पद्धतीचे सक्त आदेश एनजीटीने दिले आहेत. एनजीटीने हे निर्देश देखील दिले आहेत की भक्त आता त्या पवित्र गुंफेपर्यंत आपले मोबाइल देखील घेऊन जाऊ शकत नाही. भाविकांना आता आपले मोबाइल फोन आणि इतर महत्वाचे सामान हे अंतिम चेक पोस्टवर सोडून जावे लागणार आहे. त्या ठिकाणाहून पुढे श्रद्धाळू कोणतीच गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही. एनजीटीने अमरनाथ श्राइन बोर्डाला एक स्टोअर रूम तयार करण्यास सांगितले आहे. जेथे भक्तांचे सामान तुम्ही ठेवू शकता. 


यासोबतच एनजीटीने बोर्डाला हे देखील आदेश दिले आहेत की, अंतिम चेक पोस्टनंतर भक्तांना फक्त एका लाइनमध्येच पाठवा. जेणे करून गुंफेत जाताना कोणताही गोंधळ होणार नाही. तसेच गुंफेत लावलेली लोखंडी रॉड देखील काढून टाकली आहे. आज एनजीटी कोर्टात अमरनाथ श्राइन प्रकरणाची सुनावणी होती. 


या अगोदर हे होते नियम 


असं सांगण्यात येतं की, एनजीटीने नोव्हेंबरमध्ये वैष्णवदैवीला जाण्यासाठी भाविकांची सीमा आखून दिली होती. आता अमरनाथ यात्रेवर देखील सक्ती लावली आहे. बोर्डाला विचारण्यात आले होते की, कोर्टाने २०१२ साली दिलेल्या आदेशांचे अद्याप पालन का झालेले नाही. यासोबतच ग्रीन ट्रिब्यूनलने मंदिर परिसरात नारळ फोडणे, भाविकांची सुविधा, त्यांच्या शौचालयासाठी व्यवस्था आणि गडबड गोंधळ या मुद्यांवर प्रश्न निर्माण केले होते.