श्रीनगर : काश्मीरमधील हुरिर्यत नेता सैय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कॅलेंडर २०१६ या वर्षाचं आहे. ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंतचं वेळापत्रक यात नमुद करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कॅलेंडरवर गिलीनीची सही आहे. गिलानीच्या जावई अल्ताफ फंटूश याच्या घरून हे कॅलेंडर मिळालंय. कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षारक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनिती आखण्यात आलीय. कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आलीय. तर १५ ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकवलं गेलंय. एनआयएच्या छाप्यात हे कॅलेंडर मिळालंय.