मुंबई : जगासह देशात कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉनचे दिवसेंदिवस नवे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारही सतर्क झाली आहे. दरम्यान मध्य प्रदेश सरकारने ओमयक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Night curfew imposed in Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan informed Omicrone Variant)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री 11 ते सकाळी 5 दरम्यान हा एकूण 6 तासांचा नाईट कर्फ्यू असणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 



उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक


दरम्यान ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यालाही धोका आहे. यामुळे खबरदारी म्हणून मुख्यमंत्री आज (23 डिसेंबर) रात्री 10 वाजता टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत.


मुख्यमंत्री व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री या बैठकीत राज्यातील ओमायक्रॉनबाबतचा आढावा घेतील.