बंगळुरु : कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार अनुपस्थितच राहिले. तर दुसरीकडे काँग्रेसनंतर आता जेडीएसचा एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता आहे. जेडीएसचे आमदार नारायण गौडा हे भाजपच्या संपर्कात असून ते मुंबईला रवाना झाले. भाजप आमदार श्रीरामलू यांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक विधानसभेत दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांच्या गोंधळामुळे गुरुवारी दिवसभरातील कामकाज स्थगित करण्यात आले. भाजपच्या आमदारांनी आरोप केला आहे, काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारकडे बहुमत नव्हते. बुधवारी विधानसभेत काँग्रेसचे नऊ आमदार गुरुवारी अनुउपस्थित होते. अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत प्रवेश करताच भाजपचे आमदारांनी जोरदार गोंधळ घातला आणि घोषणाबाजी सुरु केली.


भाजपने आमदारांनी गोंधळ करत मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी परत जा, मुख्यमंत्री परत जा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, बहुमताशिवाय सरकार नाही. विना बहुमत सरकार जाऊ दे, अशा जोर जोरात घोषणा दिल्या. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले.