श्रीनगर : काश्मीर एकिकडे कोरोनाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे दहशतवाद्यांना देखील चांगलाच धडा शिकवताना दिसत आहे. कोरोना विरूद्ध सरकार तर दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कर दोन हात करताना दिसत आहे. कश्मीरच्या खोऱ्यांमध्ये गेल्या २४ तासांत भारतीय लष्कराला  ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यासंबधीत ट्विट एएनआयनं  केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, निर्दोष नागरिकांच्या हत्येसाठी कारणीभूत असलेल्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे करण्यात भारतीय लष्कराला  यश मिळाले आहे. तर इतर पाच ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याचाा प्रयत्न करत होते.


या कारवाईत भारताचा एक जवान शहीद झाला आहे, तर इतर दोन जवान गंभीर जखमी  झाले आहेत. या भागात बर्फवृष्टी प्रचंड होत असल्यामुळे जवानांना बाहेर काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे ऑपरेशन अद्यापही सुरूच असल्याची माहिती लष्करी सुत्रांनी दिली असल्याचं ट्विट एएनआय कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.