Nirav Modi : देशात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून पसार झालेल्या पळपुट्या नीरव मोदी याच्याविषयीची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Punjab National Bank ला 13500 कोटी रुपयांचा चुना लावणारा नीरव मोदी सध्या अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. कधी एकेकाळी अब्जोंच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या या महाठगाच्या बँक खात्यात सध्या अवधे 236 रुपये उरले आहेत. एका अहवालातून याबाबतचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. (Nirav Modi has only left with rs 236 in his bank latest Marathi news)


परिस्थिती बिघडलीये... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार नीरव मोदीकडे सध्या कायदेशीर कागदपत्रांसाठीसुद्धा पुरेसा पैसा नाही. एका प्रतिष्ठीत माध्यम समूहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कधी एकेकाळी देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या नीरव मोदीच्या खात्यातील रक्कम संपण्याच्याच मार्गावर आहे. फायरस्टार डायमंड इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड (Firestar Diamond International Pvt Ltd) या नीरव मोदीच्या कंपनीच्या बँक खात्यात अवघे 236 रुपये उरले आहेत. 


कंपनीच्या खात्यातून  2.46 कोटी रुपये इतकी रक्कम एसबीआय (SBI) खात्यात transfer केल्यानंतर आता त्या खात्यात फक्त 236 रुपये शिल्लक राहिले आहेत. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे ही रक्कम म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकूण थकित रकमेचा एकच भाग आहे. 


...आणि नीरव मोदीच्या संपत्तीला उतरती कळा लागली 


2019 मध्ये नीरव मोदीच्या संकटांना सुरुवात झाली. जेव्हा मेहूल चोक्सी आणि नीरव मोदीनं बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीनं 13500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार पंजाब नॅशनल बँकेकडून दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर ईडी आणि सीबीआयनं सदर प्रकरणाचा तपास सुरु केला ज्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. 


मेहुल चोक्सी (Mehul Choksi)ला दिलासा 


दरम्यान, Punjab National Bank Scam मधील आरोपी मेहुल चोक्सी याला इंटरपोलनं दिलासा दिला आहे. 2018 मध्ये इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस आता मागं घेण्यात आली आहे. चोक्सीनं भारतातून पळ काढल्यानंतर 10 महिन्यांनी ही नोटीस बजावण्यात आली होती. ज्यानंतर या नोटीसला आव्हान देत त्याबाबत फेरविचार करण्याची मागणी चोक्सीनं केली होती.