नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील दोषींना उद्या फाशी दिली जाणार होती. पण उद्याची फाशी देखील टळल्याचे वृत्त समोर येत आहे. पटीयाला कोर्टाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. यानुसार पुढच्या आदेशापर्यंत फाशी देता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी निर्भयाच्या आईन उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना फाशी तर द्यावीच लागेल. मी हार मानणार नाही असे ती म्हणाली.



निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ता याची बचाव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ्याने त्याची फाशीची शिक्षा कायम आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.


पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने पवनची याचिका फेटाळली. त्याचबरोबर त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.


सरकारी वकिलांनी म्हटलं की, 'अक्षय, विनय आणि मुकेश यांची दया याचिका फेटाळली गेली आहे. पण पवनकडून अजून दया याचिका आणि क्यूरेटिव पिटिशन दाखल होणं बाकी आहे. हायकोर्टाने दिलेला एक आठवड्याची वेळ 11 फेब्रवारीला संपली आहे. या प्रकरणातील दोषींवर इतर कोणत्याही कोर्टात कोणतीही याचिका प्रलंबित नाही. त्यामुळे नव्याने डेथ वॉरंट काढलं जावू शकतं.'