ससंदेत संरक्षण मंत्र्यांनी HAL वादावर काँग्रेसला दिलं उत्तर
राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दिली उत्तरं
नवी दिल्ली : राफेल डील प्रकरणानंतर आता विरोधी पक्षाने HAL बाबत करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर मागितलं होतं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचं असल्य़ाचं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ला एक लाख कोटींचा सरकारी टेंडर देण्याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर संसदेत खोटी माहिती दिल्याचा आरोप केला होता.
राहुल गांधींच्या आरोपावर सीतारमण यांनी म्हटलं की, HAL ने २०१४-१५ मध्ये २६ हजार कोटींपेक्षा अधिकच्या ड्राफ्टवर हस्ताक्षर केले. जवळपास ७३ हजार कोटींची अनुबंध पाईपलाईनमध्ये आहे. अशात संसदेत मी केलेल्या वक्तव्यावर शंका उपस्थित करणं चुकीचं आहे. दिशाभूल करणारी ही गोष्ट आहे.'
संरक्षण मंत्र्यांनी ६ जानेवारीला संध्याकाळी ट्विट केलं होतं. संसदेत त्यांनी पुन्हा तेच स्पष्टीकरण दिलं. सीतारमण यांच्या स्पष्टीकरणानंतर संसदेत पुन्हा गोंधळ झाला. त्यानंतर संसदेची कामकाज स्थगित करण्यात आलं.