नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषी कायद्यातील धोरणांबाबत राहुल गांधी यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केला आहे. कृषी कायद्यांबाबत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवरून मागे फिरल्याचं देखील त्या म्हणाल्या. 


सीतारमण यांनी आज बजेटवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. यात त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. कृषी कर्जमाफीचं आश्वासन देऊन मध्यप्रदेश, राजस्थानात काँग्रेसने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका सीतारमण यांनी केली
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यात काय कमतरता आहे ते सांगावं. त्यातला एक भाग काढून टाका तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे असे नुसते म्हणण्यापेक्षा त्यांनी या कायद्यात काय कमी आहे ते दाखवून द्यावं असं आव्हान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केलं आहे. 


यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे नेणारा आहे. आपल्या देशाला हा अर्थसंकल्प स्वावलंबी होण्यासाठी मदत करेल. अनेक आव्हान असूनही सरकारने देशातील दीर्घकालीन उद्दीष्टे साध्य करण्यासाठी सुधारणांवर जोर दिला आहे असंही अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं.