मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे निर्मला सीतारमण नेटकऱ्यांच्या मनात घर केलं आहे. हा व्हिडीओ मुंबईत पार पडलेल्या NSDLच्या कार्यक्रमात घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL)ने सिलव्हर ज्युबिली (Silver Jubliee)निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे निवेदन पद्मजा चंदुरु करत होत्या.


निवदेन करताना पद्मजा चंदुरु यांना तहान लागली. चंदुरु यांनी कर्मचाऱ्यांकडे पाणी मागितले. मात्र कर्मचारी पाणी घेऊन येईपर्यंत निर्मला सीतारमण ग्लास आणि पाण्याची बाटली घेऊन पोहोचल्या. एवढच नाही तर, चंदुरु यांना ग्लासमध्ये पाणी देताना दिसतायेत.पाणी घेतल्यानंतर चंदुरु सीतारमण यांना धन्यवाद म्हणताना दिसतायेत. सीतारमण यांनी स्वत: उठून पाणी दिल्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्यासाठी टाळ्याही वाजवल्या.



केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्मला सीतारमण यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. निर्मला सीतारमण यांचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. सीतारमण यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.