नवी दिल्ली : देशाच्या रस्ते वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करणाऱ्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भारतमाला या नावानं हा प्रकल्प ओळखला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात 60 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं जाळं उभारण्यात येईल. त्यासाठी पुढल्या 5 वर्षांत 8 लाख कोटींच्या कामाची सुरूवात करण्यात येणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय.


देशातली शहरं जोडणारा इकोनॉमिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून 9 हजार किलोमीटर रस्त्यांसाठी 1 लाख 20 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भारतमाला योजनेत देशातल्या 300 जिल्ह्यांमध्ये चारपदरी रस्ते बांधले जातील. याबरोबरच भारताच्या शेजारी देशांसोबत दळणवळण वाढवण्यासाठी भारत-भूतान-बांगलादेश-नेपाळ-मान्यमार कॉरिडॉर विकसित केला जाणार असून त्यासाठी 25 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


भारतमाला प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार?


मुंबई, पुणे, नागपूर, धुळे या शहरांना स्थान


इकोनॉमिक कॉरिडॉर- मुंबई-कोलकाता, मुंबई-कन्याकुमारी


इकोनॉमिक कॉरिडॉर- पुणे-विजयवाडा सोलापूर- नागपूर


इकोनॉमिक कॉरिडॉर- सोलापूर-बेल्लरी