नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानं सर्वपक्षीय राजकीय वर्तुळातून आणि इतरही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. भाजपाचे खासदार आणि रस्ते वाहतूक - महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी सुषमा स्वराज यांना आपल्या 'मोठी बहिण' तसंच 'राजकीय मार्गदर्शक' म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनानं मला मोठा धक्का बसलाय. त्यांनी नेहमीच मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं. संघटनात्मक सल्ले देत त्यांनी राजकीय मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडली' असं म्हणत नितीन गडकरी भावूक झाले.



'भारतीय राजकारणात मजबूत विरोधी नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या निधनानं देशाचं, पक्षाचं आणि व्यक्तीगत माझी मोठी हानी झालीय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, ॐ शांती' असं म्हणत त्यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिलीय. 
 



 


फाईल फोटो

सुषमा स्वराज या मृत्यूसमयी ६७ वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर गोंधळाच्या वातारणात त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.