पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच ईव्हीएमचा मुद्दा गाजला आहे. 


नितीश कुमार म्हणतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्वीट नितीश कुमार यांनी म्हटलं आहे, 'मतदारांना मतदानापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही, पराभवाच्या भीतीने ज्यांना ईव्हीएमवर टीका करायची आहे, त्यांनी करावी. मात्र ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली आहे. 


हार्दिककडून ईव्हीएम हॅकिंगचा आरोप


पाटीदार नेता हार्दिक पटेलने ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे.  मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार असल्याची टीका होत आहे. गुजरात विधानसभेचा निकाल लागायला सोमवारी लागणार आहेत.