नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटमध्ये रविवारी होणाऱ्या संभाव्या कॅबिनेट फेरबदलाबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीतीश कुमार यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फेरबदलापूर्वी जेडीयू सरकारमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नाला ते उत्तर देत होते... याबद्दल आम्हाला कोणतीही सूचना मिळालेली नाही... ना या विषयावर कोणती चर्चा झाली... याबद्दल आम्हाला केवळ मीडियातून माहिती मिळतेय, असं त्यांनी म्हटलंय. 


यापूर्वी जेडीयूच्या सूत्रांनीही त्यांना आत्तापर्यंत सरकारमध्ये सहभागी होण्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं म्हटलं होतं. 


'सरकारमध्ये सहभागी होण्यावर पक्षात कोणताही वाद नाही परंतु, काल फेरबदल संभावित असतानाही आमच्याशी कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही' असं जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलंय.