नवी दिल्ली :  नितीश कुमार यांनी महाआघाडी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत नितीश कुमार यांच्यावर धोकेबाजी करण्याचा आरोप लावला होता. त्यावर नितिश कुमार यांनी पलटवार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते. मला भेटायला आले तेव्हा वेगवेगळी कारणं देत होती. पण आम्हांला ३-४ महिन्यापासूनच माहिती होते की अशा प्रकारे प्लानिंग सुरू आहे.  आपल्या स्वार्थासाठी हा व्यक्ती काहीही करू शकते. काहीही नियम नाही.  


राहुल गांधी यांच्या आरोपावर नितीश कुमार यांनी पटलवार केला आहे. 


नितीश कुमार यांनी दिला राहुल गांधींना उत्तर 


नितीश कुमार यांना मीडियाने वेळोवेळी राहुल गांधी यांच्या आरोपाबद्दल विचारले असता त्यांनी सुरूवातीला काही उत्तर दिले नाही. पण नंतर हळूच म्हटले की त्यांना उत्तर आम्ही अजून चांगल्या पद्धतीने देऊ... नितीश यांच्या या उत्तराने आशय असा लावला जात आहे की येणाऱ्या काळात ते चांगल्या पद्धतीने उत्तर देणार आहेत. 


भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले, की आम्ही बिहारच्या जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.