बंगळुरू : कर्नाटक सरकारने राज्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हिलरच्या मागच्या सीटवर प्रवाशाला बसण्यास बंदी लावण्यात येणार आहे.


१०० सीसीपेक्षा कमी शक्तीचे इंजीन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही सरकारने दुचाकीवरील मागचं सीट हटवण्याची देखील तयारी केली आहे. हा नियम १०० सीसीपेक्षा कमी शक्तीचे इंजीन असलेल्या वाहनांना लागू होणार आहे. राज्य सरकार यासाठी टू व्हिलरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशीही बोलणी करणार आहे. या प्रकारच्या वाहनांना मागचं सीट लावू नये यावर ही बोलणी असेल.


मोटर व्हेकल अॅक्ट १९८९ मध्ये तरतूद


एका इंग्रजी दैनिकानुसार, या नियमाच्या बाबतीत राज्याच्या ट्रान्सपोर्ट मंत्रालयाने १६ ऑक्टोबर रोजी नोटीस जारी केली आहे. या नोटीशीत राज्याच्या मोटर व्हेकल अॅक्ट १९८९ चा उच्चार आहे. या नियमात १०० सीसीपेक्षा कमी ताकतीचं इंजीन असणाऱ्या टू व्हिलर्सना पिलियन म्हणजे मागील सीट लावले जावू नये.


हायकोर्टाच्या निर्देशावरून प्रतिज्ञापत्र दाखल


परिवहन मंत्री एमएच रेवन्नाने याबाबतीत माहिती देताना सांगितलं, कर्नाटक हायकोर्टाने रस्ते अपघातावर सुनावणी करताना, राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला होता. यावर हायकोर्टाच्या निर्देशावरून आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.


जुन्या वाहनांवर या निर्णयाचा फरक नाही


आम्ही मोटर व्हेकल अॅक्टला लागू करू, ज्यात १०० सीसी बाईकवर दोन लोकांची वाहतूक करण्यास परवानगी नसेल. पहिल्यांदा विकल्या गेलेल्या तसेच जुन्या वाहनांवर या निर्णयाचा फरक पडणार नाही.