नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला. यावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी हे सुटाबुटातील लोकांसाठी काम करत आहेत. गरिबांसाठी त्यांना वेळ नाही. हाच धागा पकडत आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदी यांची जोरदार खिल्ली उडवली. कुठे आहेत अच्छे दिन? असा सवाल उपस्थित करत एक कविता सादर केली. यातून मोदींच्या आश्वासनांचे काय झाले, याची विचारणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनकडून राहुल यांचे समर्थन


दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजप आणि मोदी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. मोदींच्या धोरणावर टीका केली. आपल्या भाषणादरम्यान, राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यानंतर आता जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेकडून राहुलचे समर्थन करण्यात आलेय. राहुल गांधी हे खऱ्या अर्थाने राजकीय झालेत. त्यांनी मोदी यांना जोरदार झटका दिलाय. ही जादूची झप्पी नव्हती तर ती मोदींसाठी मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेय.


आज लोकसभेत काँग्रेसकडून प्रश्न नाहीत तर देशातून लोक मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यांना जाब विचारत आहेत. राहुल गांधी यांनी जे केले ते योग्य आहे. राहुल एक परिपक्व नेता आज पाहायला मिळालेत, असे संजय राऊत म्हणालेत.