नवी दिल्ली : १ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेकेंड हँड वस्तू खरेदी किंवा विकली तर त्यावर जीएसटी नाही लागणार. अर्थ मंत्रालयाने म्हटलं की, सेंट्रल गुड्स अँड सर्विसेज (सीजीएसटी) नियम 2017 कायद्यानुसार जुनी वस्तु ज्या निसर्गात बदल नाही करत अशा वस्तूंसाठी इनपुट क्रेडिट टॅक्स (आयसीटी) नाहीं दिला जाणार. यांच्या फक्त खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातील अंतरावर जीएसटी लावला जाईल. जर विक्री किंमत खरेदी किंमतीच्या कमी असेल तर त्यावर कोणताही जीएसटी नाही लागणार.


अधिसूचना 10/2017-केंद्रीय कर (दर), दिनांक 28-06-2017 मध्ये सेकेंड हँड किंवा जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्ती ज्या कर भरतात अशा कोणत्याही विक्रेत्याकडून कोणत्याही वस्तूवर राज्यात विक्री होत असेल तर त्यावर कोणताही जीएसटी कर नाही घेतला जाणार.