चंदीगड : कोरोनात माणुसकीला जरुर साथ द्या, हे नेहमीचे साधे दिवस नाहीत, हे संकटातील दिवस आहेत. अडचणीत असलेल्यांना जी मदत शक्य असेल ती करा. या बातमीत या गरीब मजुराच्या मुलीचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता, तरी देखील मदतीला कुणीही पुढे आलेलं नाही. गरीबाचं कोरोनात कुणीचा वाली व्हायला तयार नाही. अशी देखील उदाहरणं आहेत, की जात, धर्म याचा विचार न करता लोकांनी अंत्यविधीला, उपचारांना मदत केली आहे. तरी देखील काही घटना अशा समोर येत आहेत, त्यातून संदेश जातोय की, अजूनही लोक मदतीला पाहिजे तेवढे पुढे येत नाहीत.  तर लोकांनी अशा घटनांच्यावेळी पुढे येणं गरजेचं आहे.


गरीबी किती वाईट असते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात कोरोनाच्या व्हायरसचा फैलाव झाला आहे, त्यावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण अनेकांना कोरोनाने आपल्यापासून हिरावून नेले आहे. ही घटना आपल्याच देशातील पंजाबमधील जालंधरची आहे. 


या घटनेचा व्हीडिओ पाहिल्यानंतर या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाने ५० हजाराची आर्थिक मदत दिली आहे. या व्हीडिओत हा व्यक्ती आपल्या स्वत:च्या ११ वर्षाच्या मुलीचं शव खांद्यावर नेत आहे.. हा एक गरीब मजूर आहे.


मुलीचे वडील कष्टकरी मजूर


अधिकाऱ्यांनी सांगितलं, व्हीडिओत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे, हा गरीब मजूर रामनगर भागात राहतो. या मुलीचा मृत्यू ९ मे रोजी अमृतसरमध्ये झाला. पण या मुलीच्या मृत्यूचं कारण कोव्हिड-१९ नव्हतं. तिचा कोरोनाने मृत्यू झाला नव्हता.


त्यांच्या मदतीला एकही शेजारी आला नाही


जालंधरच्या उपायुक्त घनश्याम थोरी यांनी सांगितलं की, या परिवाराची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज होती. एका व्यक्तीने हा व्हीडिओ काढला होता. 


मजूर दिलीप हे आपली मुलगी सोनीचं शव स्मशान भूमीत अंतिम संस्कारासाठी घेऊन जात होते. हा मजूर मूळ ओरिसातील होता, त्यांच्या मदतीला एकही शेजारी आला नाही, कारण त्यांना वाटत होते. कुमार यांच्या मुलीचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.


पण मोबाईलने अनेकांनी व्हीडिओ काढला


या मजुराने दिलेल्या माहितीनुसार अमृतसरच्या गुरु नानक मेडिकल कॉलेजने त्यांची मुलगी कोरोनाने संक्रमित असल्याचं सांगितलं, पण त्यांना रिपोर्ट देण्यात आला नाही. त्या मजुराला हे देखील वाईट वाटलं की, मदतीला कुणी येत नव्हतं, माझ्या मुलीला खांदा द्यायला कुणी येत नव्हतं. 


एक दोन लोकांनी व्हीडिओ बनवला असता तर ठिक होतं, पण रस्त्यावर प्रत्येक पावलावर लोक व्हीडिओ काढतायत असं वाटत होतं, म्हणून वाट आणखी जड झाल्यासारखी वाटत होती.


दिलीप हे मूळचे ओडिशामधील आहेत, रामनगरमध्ये राहणाऱ्या दिलीपला ३ मुली आहेत, मुलगी सोनू ११ वर्षांची आहे. तिला मागील २ महिन्यापासून ताप येत होता.