नवी दिल्ली : भाजप आमदार राम कदम यांनी लता  दीदींचे स्मारक शिवाजी पार्क मैदानात उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या मागणीवरून राजकारण नको असं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता दीदींना कधीही विसरता येणार नाही. त्यांचे शिवाजी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी काहींनी केलीय. पण, या मागणीची गरज नाही. यावरून राजकारण करू नका, असे राऊत म्हणाले.


महिन्याभरापूर्वी लता दीदींचा मला फोन आला होता. त्यावेळी मी अटलजींवर बोलत होतो. ते त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी अटलजी आमचे दद्दा होते असं त्या मला म्हणाल्या होत्या, अशी आठवण सांगितली.


लता दीदींच्या जाण्याची बातमी मी सर्वात आधी ट्विट करून दिली. कारण, मी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज आहे. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करेल, असं खा. राऊत म्हणाले.  


शाहरुख खान ट्रोल


शाहरूखच्या कृतीवर उगाच ट्रोल केलं जातंय. एका गटाचे, एका परिवाराचे ठराविक लोकं हे काम करताहेत. हा नालायकपणा आहे. हे लोक देशाची वाट लावतायत. तुम्हाला बाकी काही उद्योग नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.