नवी दिल्ली :  अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टँडर्ड डिडक्शननुसार ट्रान्सपोर्ट आणि हेल्थ अलाउन्स एकत्र करून किरकोळ सवलत दिली आहे. यापूर्वी ट्रान्सपोर्ट अलाऊन्स म्हणून १९२०० आणि हेल्थ अलाऊन्स म्हणून १५ हजार रुपये खर्चात सूट मिळायची आता याला वाढवून ४० हजार रुपये करण्यात आली आहे. 


आम्ही तुम्हांला सीए मनीष गुप्ता यांच्या कॅल्कुलेशननुसार कसे आपण या बदलात तुमचे पैसे वाचवू शकतात. 


उत्पन्न ३ लाख रुपये आहे तर 


तुमचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आहे ते तुम्हांला कोणतीही सूट नाही. तुमचे करप्राप्त उत्पन्न ५० हजार रुपये होते. तेव्हा तुम्ही ४० हजार स्टँडर्ड डिडक्शन दावा करू शकतात. तुम्हांला १० हजार रुपयांवर टॅक्स बसेल, म्हणजे त्यावर ५ टक्के म्हणजे ५०० रुपये टॅक्स लागणार आहे. यामुळे तुम्हांला २ हजार रुपयांची बचत होते. 


उत्पन्न ६ लाख रुपये आहे तर 


तुमचे उत्पन्न ६ लाख रुपये आहे. तर तुम्हांला कोणतीही सूट मिळणार नाही. तुमचे करप्राप्त उत्पन्न ३.५ लाख होते. यात ४० हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन कट होईल. त्यामुळे एकूण ३ लाख १० हजारांवर टॅक्स बसणार आहे. त्यापूर्वी  ३२, ५०० रुपये टॅक्स द्यावा लागत होता. आता त्यात बदल होईन तुम्हांला २४५०० टॅक्स द्यावा लागले, त्यामुळे ८००० रुपये बचत होणार आहे. 


उत्पन्न ११ लाख रुपये आहे तर 


तुमचे उत्पन्न ११ लाख रुपये आहे. तर तुम्हांला कोणतीही सूट मिळणार नाही. तुमचे करप्राप्त उत्पन्न ८.५ लाख होते. यात ४० हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन कट होईल. त्यामुळे एकूण ८ लाख १० हजारांवर टॅक्स बसणार आहे. त्यापूर्वी  १, ४२, ५०० रुपये टॅक्स द्यावा लागत होता. आता त्यात बदल होईन तुम्हांला १, ५०० टॅक्स द्यावा लागले, त्यामुळे १२००० रुपये बचत होणार आहे. 


हे तुम्हांला माहिती का 


ट्रान्सपोर्ट अलाऊन्सच्या ४० हजारच्या खर्चावर सूट 
सिनिअर सिटीझनला ५० हजारांपर्यंतच्या मेडिकल प्रिमिअमवर कर सूट 
बँक आणि पोस्टातून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त 
म्युच्युअल फंडाच्या कमाईवर १० टक्के टॅक्स 
शेअर मार्केटच्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर १० टक्के टॅक्स 
एज्युकेशन सेस  ३ टक्क्यावरून वाढून ४ टक्के झाला