नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर पाचव्या दिवशीही तोडगा निघालेला नाही. लोकपाल आणि लोकायुक्तांबाबत कालमर्यादा निश्चित निश्चित करून कार्यक्रम देण्याची मागणी अण्णांनी केलीये. त्यामुळे या संदर्भात बुधवारी पंतप्रधान कार्यालयासोबत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चर्चेनंतर अण्णांच्या उपोषणावर सकाळी अकरापर्यंत तोडगा निघेल असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. त्याच वेळी अण्णांचे निकटवर्तीय विनायक पाटील यांनी मात्र आंदोलन चिघळण्याचा इशारा दिलाय. केंद्र सरकारमधला एकही मंत्री अद्याप अण्णांना भेटला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.