नवी दिल्ली : भारतीय सैन्य सीमेवर देशाचं रक्षण करत असतात. यावेळी शत्रुसोबत लढताना त्यांना आपलं प्राणही गमवावे लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलं बलिदान देणाऱ्या जवानाला शहीद असा उल्लेख आपण करतो. मात्र, भारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' सारखे शब्दच नसल्याची माहिती समोर आली आहे. 


संरक्षण आणि गृह मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. आरटीआयमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की, कायद्यानुसार शहीद या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याची परिभाषा काय आहे?


आरटीआयमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला योग्य उत्तरचं मिळालं नाही. हा अर्ज गृह आणि संरक्षण मंत्रालयात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे गेला. पण योग्य उत्तर मिळूच शकलं नाही. 


आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर न मिळाल्याने आरटीआय कार्यकर्त्याने सीआयसीकडे सर्वोच्च अपील केलं. तसेच शहीद आणि मार्टर या शब्दांचा होत असलेला वापर थांबविण्यासाठी कायद्याने शिक्षेची तरतूद करावी अशी मागणीही केली आहे.


यासंदर्भात सूचना आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयातर्फे एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'मार्टर' आणि 'शहीद' सारख्या शब्दांचा वापर केला जात नाही. तर, त्याऐवजी 'बॅटल कॅज्युअल्टी' या शब्दाचा वापर करण्यात येतो. तर, गृह मंत्रालयात 'ऑपरेशन्स कॅज्युअल्टी' या शब्दांचा वापर करण्यात येतो.