नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस बजावली आहे. 'मै भी चौकीदार हूँ' या प्रचारगीतात सैनिकांच्या छबीचा वापर करण्यात आल्याने ही नोटीस बजावली आहे. सैनिकांची दृष्ये वगळण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत, भाजपने सैनिकांच्या व्हिडिओ क्लीपसह हे गाणे प्रकाशित केले. त्यामुळे भाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तीन दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र, काहीही खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.  


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली मै भी चौकीदार हूँ मोहीम वादात अडकली आहे. या मोहिमेसाठी भाजपने तयार केलेल्या गाण्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे सदस्य नीरज यांना नोटीस पाठवली आहे. ३ दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे. भाजपच्या या 'मै भी चौकीदार हूँ' गाण्यातील भारतीय सैनिकांच्या व्हिडिओ क्लीप्स वगळाव्यात, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र, आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत, भाजपने सैनिकांच्या व्हिडिओ क्लीपसह हे गाणे प्रकाशित केले. त्यामुळे भाजपवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.