नवी दिल्ली : लॉकडाऊनचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर होताना दिसतोय. महागाई भत्त्यात होणारी वाढ केंद्र सरकारने थांबवली होती. आता आणखी एक वाईट बातमी समोर येतेय. साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा ६ वा भत्ता थांबवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी १६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणारे ६ वा भत्ता थांबवला. सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युपीचे अप मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. ही वेतन कपात झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजार कमी येणार आहेत.


कोरोनामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हे पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. 



सचिवालय भत्ता - १० हजारहून अधिक कर्मचा्यांना किमान ६२५ रुपये आणि जास्तीत जास्त 2000 रुपयांचा लाभ मिळतो. 


शहर भरपाई भत्ता - १ लाख कर्मचाऱ्यांना किमान ३४० आणि जास्तीत जास्त ९०० रुपये मिळतो. राज्यातील प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यास ४०० रुपये विशेष भत्ता मिळतो.


पीडब्ल्यूडी कर्मचार्‍यांना संशोधन, सुव्यवस्थित डिझाइन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना या भत्ता मिळतो. 


आय अँड पी, सिंचन विभागात शिस्तबद्ध भत्ता म्हणून ५०० हून अधिक कर्मचार्‍यांना लाभ मिळतो. 


भविष्य निर्वाह खाती सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचार्‍यांना लाभ मिळतो.