आता ड्रायव्हिंग लायसंन्स बनवणं झालं सोपं! RTOतही जाण्याची गरज नाही
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसंन्स बनवायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. RTOत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही गरज पडणार नाही.
नवी दिल्ली : तुम्हाला ड्रायव्हिंग लायसंन्स बनवायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. RTOत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही गरज पडणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसंन्स बनवण्यासाठी नवे नियम बनवले आहेत. पुढील महिन्यापासून लोक सरकारी मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंगची ट्रेनिंग घेऊ शकतात. या ट्रेनिंगचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्रामुळे ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना ड्रायव्हिंग टेस्टची गरज पडणार नाही.
रस्ते परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसंन्स बनवण्याबाबत नवे नियम जारी केले आहेत. 1 जुलै 2021 पासून हे नियम लागू होतील. नवे नियम आल्यानंतर कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करून ट्रेनिंग घ्यावी लागेल. त्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर तुम्हाला सहजच ड्रायव्हिंग लायसंन्स प्राप्त होऊ शकते.
मोटर व्हेहिकल ऍक्ट 1998 च्या अंतर्गत ट्रेनिंग सेंटर्समध्ये रेमेडिअल आणि रिफ्रेशर पाठ्यक्रम उपलब्ध करण्यात येतील. मंत्रालयाने ड्रायव्हिंग सेंटर्सला हे पाठ्यक्रम अनिवार्य केले आहेत.
लहान वाहनांसाठी 29 तासांची ट्रेनिंग
रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या अनुसार मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्राद्वारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची वैधता 5 वर्षांसाठी असेल. पाठ्यक्रम 4 आठवड्यांसाठी 29 तासांचा असेल.