नवी दिल्ली : पासपोर्ट बनवण्यासाठी ज्यांना अडचणी येतात अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे, सरकारने पासपोर्ट प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे, पासपोर्टसाठी आता आणखी एक कागद कमी लागणार आहे. सरकारने संसदेत माहिती देताना सांगितलं आहे की, आता पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म दाखल देण्याची गरज पडणार नाही.


नियमात बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्मदाखल्याच्या जागी आता पॅनकार्ड किंवा आधारकार्ड पाहून जन्म आणि वयाबद्दल खात्री करता येणार आहे, मात्र पासपोर्ट नियम १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ नंतर जन्माला आलेल्या लोकांना जन्म दाखला म्हणून मान्यता प्राप्त शैक्षणिक बोर्डाचं मॅट्र्रीक्युलेशन सट्रिफिकेट, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, किंवा एलआयसी पॉलिसी बॉन्डचा प्रुफ देखील वापरता येणार आहे.


याशिवाय सरकारी कर्मचारी आपला सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड या कागदपत्रांचा देखील रेकॉर्ड म्हणून वापर करू शकतात. संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देतांना परराष्ट्र राज्य मंत्री व्ही के सिंह यांनी सांगितलं, याचा उद्देश लाखो लोकांना सोयीस्करपणे पासपोर्ट उपलब्ध करून देण्याचा आहे.


यात ६० वर्षापेक्षा कमी आणि ८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना पासपोर्ट अर्जावर, १० टक्के सूट मिळणार आहे. नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजीतही बनवले जातील.