मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई  : इन्स्टाग्रामवर एक्टिव्ह असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण इन्स्टाग्रामने आता एक नवं फिचर आणलं आहे. हे फिचर रिल्सशी निगडीत आहे. इन्स्टाग्राम रिल्स पूर्वी 60 सेकंदच करता येत असत. आता इन्स्टाग्राम रिल्स हे 90 सेकंदाचे करता येणार आहेत. टिकटॉक आणि स्नॅपचॅट सारख्या प्रतिस्पर्धी शॉर्ट-फॉर्मेट व्हिडीओशी स्पर्धा करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे नवीन वैशिष्ट्य आणलं आहे. दरम्यान टीकटॉवर व्हिडीओची लांबी 10  मिनिटांपर्यंत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरीही दीर्घ शॉर्ट- फॉर्मेट व्हिडीओच्या दिशेने इन्स्टाग्रामने हे पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे. इन्स्टाग्राम रिल्स हे विशेषत: युवा वर्गात आणि सेलिब्रिटीजमध्ये फारच लोकप्रिय आहे. रिल्सबाबत इतरही काही नवीन वैशिष्ट्य जाहीर केली आहेत. 


यामध्ये टेम्पपेट्स, स्टिकर्स, नवीन संगीत किंवा गाणं व्हिडिओच्या बॅकग्राऊंडवर टाकता येणार आहे. यामध्ये हॉर्न, क्रिकेटमधील खेळाचा आणि क्रिकेट फॅन्सचा आवाज, ड्रम आणि इतर ध्वनींचा वापर रिल्समध्ये करता येणार आहे. तर युजर्सना आता आपला व्हिडीयो थेट इस्टाग्राम रिल्समध्ये इम्पोर्ट करता येणार आहे. 


रिल्सच्या बॅकग्राऊंडला साऊंडसाठी इम्पोर्ट ऑडिओ फीचरचा वापर करता येणार आहे. म्हणजेच आता इन्स्टाग्रामच्या कॅमेराऐवजी आता फोनच्या कॅमेरामधून शूट केलेला व्हिडीयो इस्टाग्रामवर टाकता येणार आहे. 


जर 16 वर्षांखालील मुलांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट ओपन केलं तर ते बाय डिफॉल्ट प्रायव्हेट अकाऊंट बनणार आहे. प्रायव्हेट अकाऊंट हे अधिक सुरक्षित असेल कारण यूजर्स त्यांचे केवळ फॉलोअर्स, स्टोरी, पोस्ट आणि इन्स्टाग्राम रिल्सचं पाहू शकणार आहेत. 


प्रायव्हेट अकाऊंटच्या पोस्ट एक्स्पोर एंड हॅशटॅग सेक्शनमध्ये दिसणार नाहीत. ज्यामुळे प्रायव्हेट अकाऊंट असलेली मुलं त्यांना माहित नसलेल्या व्यक्तींचे लाईक्स आणि कमेंट्स पाहू शकणार नाहीत. हे फिचर याच आठवड्यापासून सुरु होत आहे. 


या आठवड्याच्या सुरुवातीलाच इन्टाग्रामने एक नवं अलर्ट फिचर लॉन्च केलं आहे. या अलर्ट फिचरच्या मदतीने लोक आपल्या हरवलेल्या मुलाची माहिती देऊ शकतात. यासाठी इन्स्टाग्रामने इतर अनेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे.