नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. बिहार सरकारने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, अशी शिफारस बिहार सरकारने केंद्राकडे केली होती. ही शिफारस केंद्राने मान्य केली आहे. यामुळे महाराष्ट्र पोलिसांची नामुष्की झाली असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरून वाद सुरू होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंहच्या वडीलांनी बिहारच्या पाटणा शहरात सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची एफआयआर दाखल केली होती. यानंतर पाटण्यातून बिहार पोलीस हे मुंबईत चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर चौकशीसाठी बिहार पोलिसांकडून आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केलं होतं, तर आपल्या चौकशीत अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप या अधिकाऱ्यांकडून झाला होता.


सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक कंगोरे आणि नवनवीन माहितीसमोर येत असल्याने बॉलीवूड जगताचं याकडे लक्ष लागून आहे.