निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या `या` योजनेबद्दल वाचलं का?
Retirement Planning : आर्थिक नियोजन आणि त्यात येणारे अडथळे सध्या अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळतात. सरकारी योजनाही यात मागे नसतात. अशीच एक योजना तुम्ही पाहिली का?
Retirement Planning: निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असेल? हाच प्रश्न सध्याच्या तरुणाईच्याही मनात घर करत आहे. इतक्या कमी वयात निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करणाऱ्यांपासून निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या सर्वांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण, महागाई कितीही वाढो, काळ कितीही पुढे जावो सरकारच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्हाला उतारवयात बराच फायदा होईल असा दावा या योजनेद्वारे करण्यात येत आहे. ही योजना म्हणजे NPS Scheme.
उदाहरणासह समजून घ्या...
समजा तुमचं वय 30 वर्षे आहे आणि तुम्हाला महिन्याला 5 हजार रुपये एनपीएस खात्यात गुंतवणूक करणं शक्य आहे. असं केल्यास तुम्ही एका वर्षाला साधारण 60 हजार रुपयांची गुंतवणूक करता आणि येत्या तीस वर्षांसाठी हा गुंतवणुकीचा आकडा थेट 18 लाखांवर पोहोचेल.
मॅच्योरिटीच्या वेळी तुम्ही होणार मालामाल
सातत्यानं या योजनेमध्ये गुंतवणूक करत राहिल्यास मॅच्योरिटीच्या वेळी तुमच्या हातात एक मोठी रक्कम येईल. जिथं तुम्हाला एकूण 1,13,96,627 रुपये मिळतील. यामध्ये व्याजाची रक्कम असेल 95,96,627 रुपये. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा मिळेल. ज्यामुळं गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला समधानकारक परतावा मिळू शकेल.
NPS Scheme योजेनेमध्ये निवृत्त झाल्यास तुम्हाला 2 पर्याय मिळतात. इथं पहिला पर्याय म्हणजे तुम्ही सर्व पैसा एखाद्या अॅन्युटी प्लानमध्ये गुंतवून पेंशनसाठी लाभार्थी ठरता. आणि दुसरा पर्याय म्हणजे 60 रक्कम काढून घेत उर्वरित 40 टक्के रकम अॅन्युटी प्लानमध्ये ठेवता. किंबहुना 40 टक्क्यांची मर्यादा बंधनकारकच आहे.
हेसुद्धा पाहा : संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे
ग्राहक 1,13,96,627 रुपयांचे 40 टक्के म्हणजेच 45,58,650 रुपये अॅन्युटी प्लानमध्ये ठेवण्याचा फायदा घेतात. पण, त्यावेळी पेंशन मात्र कमी येते. इथं एका वर्षाला साधारण 3,19,105 ते 364,692 रुपये असून एका महिन्याला ही रक्कम 26,592 ते 30,391 रुपयांच्या घरात जाते.
निवृत्तीनंतर हातात येणारी रक्कम हीच उतारवयाचा आधार असते. त्यामुळं योग्य वयातच गुंतवणुकीचे पर्याय शोधणं आणि त्यावर विचारपूर्वक गुंतवणूक करणं हेसुगद्धा तितकंच महत्त्वाचं. खासगी बँकांप्रमाणंच सरकारकडूनही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं गुंतवणुकीसाठी काही योजना राबवण्यात येतात. या योजनांचा कधी आणि केव्हा फायदा करून घ्यायचा यासाठी तुम्ही सतर्क राहिल्यास मिळणारा परतावा समाधानकारकच असतो.