नवी दिल्ली : जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल, तर सावधान! कारण NSA डोभाल यांचे ट्विटरवर हॅंडल नाही. परराष्ट्र मंत्रालयनेही म्हटले आहे की, अजित डोभाल यांचे कोणतेही अधिकृत ट्विटर हॅंडल नाही.  याचाच अर्थ सोशल मीडिया साईट्सवर अजित डोभाल यांचे असणारे अकाऊंट बनावट आहे. त्या अकाऊंटपासून आपण सावध राहायला हवे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट अकाऊंटवर फॉलोवर्स
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत. तेथे त्यांच्या नावाने जे अकाऊंट सुरू आहेत. ते सर्व बनावट आहेत. अशातच त्यांच्या नावाने सुरू असलेल्या बनावट अकाऊंटपासून नेटकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला देखील बागची यांनी दिला आहे.


आपल्या कामामुळे डोभाल यांना मिळाली ओळख
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपल्या कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना लाइमलाइटमध्ये राहण्याची हौस नाही. त्यांच्या जबाबदार स्वभावामुळे ते नको तिथे वक्तव्य करीत नाहीत. त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचे भारतीय चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या बनावट अकाऊंटवर फॉलोवर्सची संख्या देखील अधिक आहे.