नवी दिल्ली : चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्या नावांनी वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजची सध्या नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठीचा शोध सुरु आहे. सध्या NSE कडून एमडी आणि सीईओ या पदांसाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्यानं निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांची जबाबदारी सांभाळणार आहे. 


जुलै महिन्यात लिमये यांचा कार्यकाळ पूर्ण... 
विक्रम लिमये यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ जुलै 2022 मध्ये पूर्ण होत आहे. जे पाहता शुक्रवारी (NSE) कडून रिक्त होऊ पाहणाऱ्या या पदांसाठीच्या अर्जांची मागणी करण्यात आली. 


इनीश‍ियल पब्‍ल‍िक ऑफर‍िंग (IPO) चा अनुभव असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरु शकते. किंबहुना असंही म्हटलं जात आहे की, लिमये यांचा कार्यकाळ वाढवलाही जाऊ शकतो. 


पगाराचा आकडा थक्क करणारा 
जुलै 2017 मध्ये चित्रा रामकृष्ण एनएसईपासून वेगळ्या झाल्यानंतर विक्रम लिमये यांची नियुक्ती एमडी आणि सीईओ पदांवर करण्यात आली. 


त्यावेळी त्यांना वार्षिक 8 कोटी रुपये इतकं एकूण मानधन मिळत होतं. चित्रा रामकृष्ण यांनी जेव्हा हे पद सोडलं तेव्हा त्यांचा पगार 7.87 कोटी रुपये (प्रतिवर्ष) इतका होता. 


केव्हापर्यंत करता येणार नोकरीसाठीचा अर्ज 
25 मार्च पर्यंत इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, जर लिमये यांना त्यांच्या या पदाचा कार्यकाळ वाढवून दिला जाणं अपेक्षित असेल तर त्यांना स्पर्धेत असणाऱ्या पात्र उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार आहे. 


एनएसईच्या रिब्रँडिंगसाठी लिमये यांना मुख्यत्वे ओळखलं जातं. ज्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याचीच दाट शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आ